Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Malvan Band : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची देखील हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मालवण मधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत. निषेध मोर्चात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा… Maharashtra News Live : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “काँग्रेसवाले निवडणुकीपुरतं आश्वासन देतात, पण…”, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन “अजित…
ajit pawar sharad pawar (5)
अजित पवार म्हणाले, “गेल्या वेळी मी जरा एकटा पडलो होतो, पण यावेळी माझी आई…”!
ajit pawar sharad pawar maharashtra vidhan sabha election
“शरद पवारांनी संधी दिली तेव्हा भीती वाटत होती”, अजित पवारांनी सांगितली ३४ वर्षांपूर्वीची ‘ती’ आठवण!
Amol Kolhe On Ajit Pawar
Amol Kolhe : “मी पक्ष बदलला, पण पक्ष चोरला नाही”, अमोल कोल्हेंचं बारामतीतून अजित पवारांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis Taunts Sharad Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला! “पावसात भिजलं म्हणजे निवडून येऊ असं..”
Sharad Pawar Pratibha Pawar
Pratibha Pawar : “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने वेधलं बारामतीकराचं लक्ष
Eknath Khadse
Eknath Khadse : “पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल”, एकनाथ खडसेंची जनतेला भावनिक साद; राजकीय निवृत्तीची केली घोषणा
Mahadev Jankar On Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Mahadev Jankar : “मी मुख्यमंत्री कधीच होणार नाही, पण पाच मिनिटं तरी पंतप्रधान होईल”, महादेव जानकरांचा मोठा दावा

या मोर्चाच्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १७ पोलीस अधिकारी, ५७ अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तरी शिवप्रेमी, नागरिकांनी शांततेत मोर्चा काढत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.