जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, कांदा या पिकांसह आंबा मोहराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील वेल्हाणे येथील एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यात गारपीटही झाली. शनिवारी सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरू झाल्यामुळे वेल्हाणे शिवारात काम करणाऱ्या योगेश पवार-राजपूत (२०) हा एका झाडाखाली जाऊन थांबला. यावेळी त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला. लळिंग परिसरात जयवंत गवळी यांची गाय विद्युत तार अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडली. वादळी वाऱ्यामुळे ही तार पडल्याचे सांगण्यात येते. विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लगेच परिसराचा पाहणी दौरा केला. तालुक्यातील सैंदाणे परिसरातही वादळी पावसाने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. शिरपूर तालुक्यातील बहुतेक भागात पाऊस झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा