माकडांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात प्रवासी ५०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी वरंधा घाटात हा प्रकार घडला असून यामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृत प्रवाशाचे नाव अब्दुल शेख असे आहे.
हेही वाचा >> चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; म्हणाले, “औरंगजेबजीच्या कबरीवर…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय अब्दुल शेख कारमधून कोकणाकडे जात होते. मात्र मध्येच वाघजाई मंदिराजवळील वरंधा घाटाजवळ त्यांनी कार थांबवली. या भागात माकडे असल्यामुळे त्यांच्यासोबत ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते ५०० फूट खोल दरीत कोसळले.
हेही वाचा >> उत्तर प्रदेश खरंच मुंबईची फिल्मसिटी घेऊन जाणार? योगी आदित्यनाथ यांनी दिले उत्तर; म्हणाले “आम्ही…”
हेही वाचा >>
दरम्यान, या घटनेत अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सह्याद्री रेस्क्यू ग्रुपच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोक्याच्या ठिकाणी जाऊन फोटो घेण्याचा मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.