जालना : शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत एका ३० व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही आत्महत्या नसून मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भावानेच हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. अमोल सपकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा >>>> यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार! गणेश मूर्तीसाठी उंचीची मर्यादा नाही, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सपकाळ मूळचे भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील रहिवासी होते. आज सकाळी अमोल यांचा भाऊ त्यांना भेटण्यासाठी जालना शहरातील इन्कमटॅक्स कॉलनीतील घरी आला होता. यावेळी त्यांना अमोल यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृत अमोल यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा केला आहे. तसेच या हत्येमागे अमोल यांची पत्नी आणि पत्नीचा भाऊ असल्याचा आरोपही अमोल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा >>>> आरे मेट्रो कारशेड वाद : “…तर ही वेळच आली नसती,” आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केला गंभीर आरोप
दरम्यान, अमोल यांची हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमोल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करत आहे.