अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी तासगावच्या तरुणाला सत्र न्यायालयाने मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असून तिच्याशी शारिरीक संबंध केले. तसेच जुलै २०१७ मध्ये पिडीताला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.
या प्रकरणी संशयिताविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसांनी तपास करुन संशयित लखन देवकुळे याच्याविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्या. डी.एस.हातरोटे यांनी आज या खटल्याचा निकाल जाहीर केला. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार देवकुळे याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रु. दड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.