सोलापूर : खाऊ देण्याचे आमीष दाखवून एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दशरथ महादेव शेळके (वय ५३, रा. मोहोळ, जि. सोलापूर) यास सोलापूरच्या विशेष न्यायालयाने दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोहोळ तालुक्यातील एका गावात १६ मार्च २०२१ रोजी पीडित मुलीच्या वडिलांच्या वस्तीशेजारी राहणारा विकृत मनोवृत्तीचा आरोपी दशरथ शेळके याने  दुपारच्या सुमारास आपल्या घरात पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करताना सापडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला तीन वर्षाची शिक्षा; अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल

पीडित मुलीची आई वस्तीवर जनावरांचा चारा कापून त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी दशरथ शेळके याच्या घरासमोरून जात असताना तिच्या नजरेत आपल्या लहानग्या मुलीवर लैंगिक अत्याचार करताना आढळून येताच मुलीच्या आईने वस्तीवर आरडाओरड करून नव-याला बोलावून घेतले. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दशरथ शेळके यास कडक शब्दात जाब विचारला. त्यावेळी पीडित मुलीने, बाबाने (आरोपी दशरथ) खाऊ देतो म्हणून घरात बोलावले आणि घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपी दशरथ शेळके याच्या विरूध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. माने यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरूध्द   दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांच्यामोर झाली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी, त्याची पत्नी, पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी आदींची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीने केलेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने यांनी काम पाहिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man gets life imprisonment till death for for sexually assaulting minor girl zws
Show comments