अमरावती : व्यसनाधीन पतीने कौटुंबिक वादातून आपल्या सात वर्षीय मुलीसमोरच पत्नीवर चाकूने अनेक वार हत्या केल्याची घटना येथील आदर्शनगर परिसरात घडली. जया घुले (३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. वाशीम जिल्ह्यातील येळगावचा कमलेश घुले (४०) हा गुजरातमधील अहमदाबाद येथे टाईल्स फिटिंगचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पती-पत्नीत भांडणे होत होती. त्याला कंटाळून जया ही चार वर्षीय मुलगा आणि सात वर्षीय मुलीसह माहेरी वास्तव्यास होती. कमलेश हा शनिवारी रात्री घरी पोहोचला. त्याने मद्यधुंद अवस्थेत जयासोबत वाद घातला आणि तिचे केस पकडून चाकूने अनेक वार केले. घटनेच्या वेळी जयाची सात वर्षीय मुलगी हजर होती. वडिलांचे हे क्रूर रूप पाहून ती प्रचंड घाबरली. तेथून तिने पळ काढला. घटनेनंतर आरोपी कमलेश पसार झाला. उपचारादरम्यान जयाचा मृत्यू झाला. पोलिसांनी फरार कमलेशचा शोध सुरू केला आहे.
मुलीसमोरच चाकूने वार करून पत्नीची हत्या
वडिलांचे हे क्रूर रूप पाहून ती प्रचंड घाबरली. तेथून तिने पळ काढला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-02-2019 at 00:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed wife in front of 7 year old daughter