माथेरानमधील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर एक अत्यंत घृणास्पद अशी घटना घडली आहे. १२ जुलै रोजी आपल्या तीन मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला गेलेल्या या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने बलात्कार केला आहे. तर उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ज्या दोघांनी बलात्काराच्या घटनेचे चित्रिकरण करुन ते प्रसारित केले, त्यापैकी एक असलेल्या २२ वर्षीय युवकाला गेल्या शुक्रवारी (१९ जुलै) पोलिसांनी अटक केली आहे. चित्रिकरण करणारी त्यांची सहकारी मैत्रिण आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या एका मैत्रिणीने बहाण्याने माथेरानमधील या हॉटेलमध्ये आणले होते. या घटनेतील चारही जण परस्परांना चांगले ओळखत असून ते एकाच परिसरात राहणारे आहेत.

Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune Porsche accident, minor driver friend,
पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही
Daljeet Kaur
पूर्वाश्रमीच्या पतीवर दलजीत कौरचा आरोप; म्हणाली, “त्याने वर्षभर आमच्या मुलाकडे…”
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा

हेही वाचा : Dhramveer 2: “माझ्या सिनेमात अनेकांचे मुखवटे…”, ‘धर्मवीर २’ नंतर देवेंद्र फडणवीसांना स्वतःचा सिनेमा काढण्याची इच्छा

घटनेतील पीडित मुलीने आपण एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून दोन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचे आपल्या पालकांना सांगितले होते. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, माथेरानमधील हॉटेलमध्ये त्या दोन मुलांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण केले. विशेष म्हणजे चित्रिकरण करण्यामध्ये तिच्याच जवळच्या मैत्रिणीचाही समावेश असल्याचा दावा या पीडित मुलीने केला आहे. चित्रिकरण करण्यात आलेला हा व्हिडीओ समाज माध्यमांवर १४ जुलै रोजी प्रसारित करण्यात आला.

या मुलीच्या नातेवाईकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. याबाबत पीडित मुलीकडे तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने या घटनेचा खुलासा केला. आपल्यावर माथेरानमध्ये बलात्कार झाला असून घाबरल्यामुळे याबाबत कुणाशी काहीही बोलले नाही, असेही तिने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर या मुलीच्या आईने शुक्रवारी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर, पोलिसांनी या तीन आरोपींपैकी एकाला अटक केली. यातील मुख्य आरोपी हा घाटकोपरचा रहिवासी असून अद्यापही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही या खटल्यामध्ये आरोपी ठरवण्यात आले आहे.

हेही वाचा : बांगलादेशी महिलेची घुसखोरी, बोगस कागदपत्रे बनवून वास्तव्य; प्राथमिक पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघड

अँटॉप हिल पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भागवत गरंडे यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये सध्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये कलम ६४ (बलात्कार), ६५ (१) (१६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार), १३७ (२) (अपहरण), ३ (६) (अनेक लोकांनी केलेला गुन्हा), ३ (५) (एकसारखाच हेतू) आणि पॉस्को कायद्याच्या (POCSO) कलम ४, ६, ८ आणि १२ (लैंगिक अत्याचार) नुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ अ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) आणि ६७ ब (मुलांचे लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कृत्य दर्शविणारी सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) देखील लागू केले आहे.