हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एका ५४ वर्षीय माणसाने लाखो रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सॅमियल गायकवाड असं या व्यक्तीचं नाव आहे. .याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. गायकवाड हे हृदयाच्या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत,त्यांच्यावर पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ते अडीच लाख खर्च होणार होता. त्यासाठीच चोरी केल्याची कबुली अनिल याने दिली आहे. दरम्यान, त्याच्यावर खडकी पोलिसात देखील गुन्हा दाखल असल्याचे माहिती मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल गायकवाड हे पत्नी,मुलासह पुण्यात राहात असून त्याचे नातेवाईक हे पिंपरी-चिंचवड शहरात रहातात. अनिल याला हृदयरोग असून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजार बरा करण्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले,त्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च लागणार होता. अनिल पिंपरी-चिंचवड शहरातील नातेवाईकांकडे आला असता त्याने चिंचवड येथून फिर्यादी अमोल रावळ यांच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल १ लाख २२ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि मोबाईल चोरला होता. याच पैशांतून अनिल उपचार घेणार होता,त्यापूर्वीच पिंपरी पोलिसांनी अनिलला अटक केली.

सीसीटीव्हीमुळे आरोपीचा लागला शोध

अनिल गायकवाड याने चिंचवड परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल आणि सोन्याच्या बांगड्या लंपास केले तेव्हा त्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली होती.त्या अनुषणगाणे पिंपरी पोलीस तपास करत होते.त्या दिशेने त्यांनी तपास सुरू ठेवला,त्याची ओळख पटली, अनिल हे पिंपरी-चिंचवड शहरातील नातेवाईकांकडे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांना अनिल यांना ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांच्या पथकाने केली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाट हे करत आहे.