अलिबाग – भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे घडली आहे. अजय संतोष वाघमारे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
हेही वाचा >>> “मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५ वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी संतोष यांचा मुलगा अजय तिथे गेला. याचा राग धरून राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. या मारहाणीत अजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला त्याची पत्नी हीने अर्चना वाघमारे आणि इतर लोकांनी औषध उपचार करता जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी राहूल वाघमारे याचे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे.