कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मांडवी एक्सप्रेस बंद पडल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. माणगावच्या जवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मांडवी एक्सप्रेस बंद पडली होती.

एक तासाहून अधिक वेळेपासून ही एक्सप्रेस एकाच ठिकाणी सिंगल ट्रॅकवर उभी होती. याचा परिणाम कोकण रेल्वेच्या इतर गाड्यांवर झाला परिणामी कोकण रेल्वे विस्कळीत झाली. दरम्यान, जवळपास तासाभरानंतर नवं इंजिन लावून मांडवी एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे, त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे.

Story img Loader