अलिबाग : मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रो रो सेवा सुरू राहणार आहे.
मुंबईहून अलिबागला येण्यासाठी जलद आणि सोयीचा मार्ग म्हणजे गेटवे ते मांडवा हा जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची बचत होत असल्याने प्रवासी वर्षातले आठ महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने करीत असतात. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजठा या प्रवासी बोटी सुरू असतात. पावसाळ्यात या प्रवासी बोटी बंद ठेवल्या जातात.
हेही वाचा – “दु:ख हेच आहे की…”, क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंना पाठिंबा देतानाच मांडली भूमिका!
जूनपासून पावसाळा हंगाम सुरू होत असल्याने या काळात येथील जलप्रवास करणाऱ्या बोटी बंद केल्या जातात. यावेळी २६ मे पासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे.