पंढपूरच्या मंगल शाह (७१ वर्ष) या गेल्या ५० वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये एड्सबाधित मुलांसाठी त्यांचं काम सुरू आहे. २००१ साली प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याला त्यांनी नवी ओळख दिली. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलल्या गेलेल्या या मुलांनाही आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या हेतूने मंगल शाह यांचं समाजकार्य सुरू आहे.
एड्सबाधित मुलांसह मनोरुग्ण महिला, वयोवृद्धांसाठीही त्यांची संस्था काम करते. शुन्य ते १८ वर्ष एड्स बाधित मुलांसाठी काम करणारी ही महाराष्ट्रातील सध्या एकमेव संस्था आहे.