Mangaon Bus Accident 8 women injured : रायगडमधील माणगावच्या गोरेगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. एक एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली असून या बस अपघातात आठ महिला जखमी झाल्या आहेत. तसेच एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक प्रशासन व पलिसांनी बसमधील महिलांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. बसमधून बाहेर काढलेल्या महिलांना जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महिलांना या बसने नेलं जात होतं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा सरकारचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतण्याची घटना अतिशय गंभीर आहे. माणगावमध्ये एसटी बसला झालेल्या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या महिलांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि सरकारला माझी विनंती आहे की महिलांना तातडीने आवश्यक ते उपचार द्यावेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangaon bus accident raigad vehicle fell into 50 feet deep vale 8 women injured asc