पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती आहे. कृषी विद्यापीठाने तातडीने संशोधन करून फळधारणा टिकवावी, असे मत आंबा बागायतदारांचे आहे.पाऊस व ढगाळ वातावरण, बदलते हवामान यामुळे तुडतुडे, भुरी रोगासारख्या फुडकिडी तसेच उष्णतावाढीमुळे फळगळ होण्याचा धोका आहे. तसेच पावसामुळे आंबा देठाभोवती काळे डाग पडून फळगळतीची भीती आहे.काजू पिकांवर भुरी रोगासह मोहोर काळा पडून किंवा जळण्याची शक्यता असून भातशेतीवरही पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा लागवडीखाली २७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २० हजार हेक्टरवरील आंबा उत्पादनक्षम आहे. ६१ हजार हेक्टर क्षेत्रात काजू पीक असून ३९ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादित क्षेत्र आहे. हे सर्व क्षेत्र बाधित होण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला आहे.हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे झालेली नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे, पण त्यासाठी पंचनामे, पावसाची नोंद आणि विमा कंपनीचे हप्ते भरले असतील त्यांचाच विचार होऊ शकतो. त्यासाठी यंत्रणेला निर्देश देण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे आंबा-काजूचे नुकसान
पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती आहे. कृषी विद्यापीठाने तातडीने संशोधन करून फळधारणा टिकवावी, असे मत आंबा बागायतदारांचे आहे.
First published on: 19-02-2013 at 04:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango cashew nut loss by rain in sindhudurg