पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती आहे. कृषी विद्यापीठाने तातडीने संशोधन करून फळधारणा टिकवावी, असे मत आंबा बागायतदारांचे आहे.पाऊस व ढगाळ वातावरण, बदलते हवामान यामुळे तुडतुडे, भुरी रोगासारख्या फुडकिडी तसेच उष्णतावाढीमुळे फळगळ होण्याचा धोका आहे. तसेच पावसामुळे आंबा देठाभोवती काळे डाग पडून फळगळतीची भीती आहे.काजू पिकांवर भुरी रोगासह मोहोर काळा पडून किंवा जळण्याची शक्यता असून भातशेतीवरही पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा लागवडीखाली २७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २० हजार हेक्टरवरील आंबा उत्पादनक्षम आहे. ६१ हजार हेक्टर क्षेत्रात काजू पीक असून ३९ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादित क्षेत्र आहे. हे सर्व क्षेत्र बाधित होण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला आहे.हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे झालेली नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे, पण त्यासाठी पंचनामे, पावसाची नोंद आणि विमा कंपनीचे हप्ते भरले असतील त्यांचाच विचार होऊ शकतो. त्यासाठी यंत्रणेला निर्देश देण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा