सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यास अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा बसला. ऐन मोहरात आलेल्या आंब्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घेरल्यामुळे फुलारून आलेली आंब्याची झाडे झडून गेली, तर द्राक्षबागेत जमिनीवर द्राक्षाच्या मण्यांचा सडा पडला. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, परंडा, लोहारा व उमरगा तालुक्यात द्राक्ष व गावरान आंबा उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक घट होणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यातील आंबा आणि द्राक्ष उत्पादकांना आíथक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
मागील आठवडय़ात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. रानावर काढून टाकलेली ज्वारी, करडई भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या बरोबरच कडबाही भिजून बेचव झाला. पावसामुळे ज्वारीची नसíगक चकाकी नाहीशी झाली. आंब्याचा मोहर गळाल्याने उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घट होणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव, कौडगाव, खानापूर, आंबेजवळगा, तुळजापूर तालुक्यातील मुर्टा, नळदुर्ग, सिंदफळ, सावरगाव, माळुंब्रा, काकंबा, उमरगा तालुक्यातील कदेर, मुरुम, सुंदरवाडी, दािळब, लोहारा तालुक्यातील कास्ती बु, लोहारा, माकणी, सास्तूर, कळंब तालुक्यातील मोहा, कोठाळवाडी, िपपळगाव, परंडा तालुक्यातील परंडय़ासह तालुक्यात काही ठिकाणी द्राक्षांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मात्र, या परिसरातील सर्वच बागांना नुकसानीचा फटका बसला. सलग चौथ्या वर्षी ढगाळ वातावरण, गारपिटीमुळे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दुसरीकडे दुष्काळामुळे प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत. पावसाअभावी सुकत असलेल्या फळबागांना यामुळे जीवदान मिळेल, असा अंदाज कृषितज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, फळ अवस्थेत असलेल्या द्राक्ष, आंब्याचे मात्र नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा दणका; आंब्याची चव यंदाही महाग
सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यास अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा बसला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-03-2016 at 01:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango rates increase because untimely rains