रत्नागिरी : पाऊस परतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सध्याचे थंडगार वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक असून लवकरच पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. अनियमित पावसामुळे आंबा, काजूसह अन्य फळपीक घेणाऱ्या बागायतदारांचे नियोजन व आर्थिक गणित गेली काही वर्षे बिघडले आहे. यंदाही दिवाळीपर्यंत मोसमी पाऊस पडत होता. शेवटचे काही दिवस तर वादळी पावसामुळे भातशेतीचेही नुकसान झाले. पण त्यानंतर थंडीला आरंभ झाला. दिवसा मात्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे  भात कापणी आणि झोडणीची रखडलेली कामे पूर्ण झाली.

 हवामानातील या बदलांबरोबर आता थंडी आणि वारा असे पोषक वातावरण असल्यामुळे हापूसच्या कलमांना लवकरच मोहोर येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आंबा बागायतदारांकडून व्यक्त केला जात आहे. यावर्षी जून, जुलैमध्ये कलमांना पालवीच फुटलेली नव्हती. सध्या ४० टक्के झाडांना पालवी फुटलेली असून उर्वरित ६० टक्के झाडांच्या फांद्या जून आहेत. पाऊस लांबल्यामुळे यावर्षी दरवर्षीपेक्षा यंदा  मोहोर येण्याची प्रक्रिया पंधरा दिवस उशिरा सुरू झाली आहे. परंतु याचा परिणाम पहिल्या टप्प्यातील आंब्यावर होणार नाही. चालू महिन्यात पहिल्या टप्प्यातील मोहोर दिसू लागेल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ही प्रक्रिया आणखी गती घेईल, अशी अपेक्षा आहे. कातळावरील किंवा डोंगर उतारावरील बागांमध्ये हे चित्र मुख्यत्वे दिसू लागेल आणि त्यानंतरच्या काळात हवामानामध्ये विशेष चढ-उतार झाले नाहीत तर पुढील फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंबा बाजारात दिसू लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
Datta Bargaje
सकारात्मकतेकडे बीडची दोन पावले !
tabebuia rosea trees bloom along vikhroli highway
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप

अर्थात आंब्याचा हंगाम खऱ्या अर्थाने मार्च, एप्रिल व मे अशा तीन महिन्यांत असतो. पण गेल्या काही वर्षांत बदलत्या वातावरणामुळे हा हंगाम कधी दोन महिने, तर कधी अडीच महिन्यावर आलेला आहे. गतवर्षी आंब्याचा बाजार जेमतेम दोन महिने टिकला. त्यामुळे उत्पादकांना अपेक्षित नफा झाला नाही.  मार्च महिन्यात आंब्याला दर चांगला मिळतो. या कालावधीत जास्त उत्पादन हाती आले तर हंगामाचे आर्थिक गणित सुरळीत राहते. गेल्याही वर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत भाव समाधानकारक होता. त्यानंतर मात्र एकदम उत्पादन वाढल्याने तो घसरत गेला. जून महिन्यातील आंब्यामधून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. बराचसा आंबा कॅनिंगसाठी दिला जातो. पण संपूर्ण हंगामाचे चित्र वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. त्यामुळे पुढील तीन महिन्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण कसे राहील यावर लाभ-हानीचे कोष्टक ठरणार आहे. सध्याचे वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक असून  दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसची स्थिती चांगली राहील. वातावरण फार बिघडले नाही तर आंब्याची बाजारपेठ सुमारे तीन महिने टिकून राहील, असा अंदाज येथील प्रसिद्ध बागायतदार तुकाराम घवाळी यांनी व्यक्त केला.

Story img Loader