Manikrao Kokate On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली. एवढंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावरही नाराजी व्यक्त केली होती. तसेच जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधान करत आपण लवकरच पुढची भूमिका सांगणार असल्याचंही भुजबळांनी म्हटलं होतं.

दरम्यान, यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली. मात्र, या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाष्य करत खोचक टीका केली. “छगन भुजबळ यांना ओबीसी म्हणून फक्त मुलगा आणि पुतण्या दिसतो. मात्र, दुसरा ओबीसी दिसत नाही”, अशा शब्दांत मंत्री कोकाटे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

“छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मनातील काही शैल्य बोलून दाखवलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोडगा काढण्याचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आणि ते त्या पद्धतीने प्रयत्न करतील, असा विश्वास मला आहे. कारण आपण जर मंत्रिमंडळ पाहिलं तर मंत्रिमंडळात ४२ मंत्र्यांपैकी जवळपास १७ मंत्री हे ओबीसी तर १६ मंत्री मराठा आहेत. त्यामुळे सर्वांनाच समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याबाबत फडणवीसांना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय ते घेऊ शकतात. त्यामध्ये आमचं काहीही म्हणणं नाही”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती

‘भुजबळांना ओबीसी म्हणून पुतण्या आणि मुलगा दिसतो’

माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली. कोकाटे यांनी म्हटलं की, छगन भुजबळ यांच्या मनात काय चाललंय हे मला सांगता येणार नाही. छगन भुजबळ यांना ओबीसी म्हणून ते आणि त्यांचा पुतण्या व मुलगा एवढंच दिसत असेल, त्यांना दुसरा ओबीसी दिसत नाही”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

‘भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळांची समजूत काढण्यासाठी कोणी गेलं नाही? असं विचारलं असता यावर माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “भुजबळांची समजूत कशामुळे काढायची? काही चूक असेल तर समजूत काढतात. काही चूक नाही तर मग समजूत कशाची काढायची? आमच्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. आमच्या पक्षांनी भुजबळांना जो न्याय दिला तो न्याय कोणत्याही पक्षांनी दिलेला नाही. त्यामुळे काही चूक झाली असं मला तरी वाटत नाही”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

Story img Loader