अमरावतीत गुरूवारी ( ६ एप्रिल ) हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालीस पठणाचे आयोजन करण्यात आलं होते. तेव्हा बोलताना खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो,’ असा हल्लाबोल राणांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारांवर तुमचे ४० आमदार निवडून आले, ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त ठेवली नाही,” असे टीकास्त्र नवनीत राणांनी सोडले आहे.

हेही वाचा : रोशनी शिंदे प्रकरणावरून भावना गवळींनी अमित शाहांची घेतली भेट, ठाकरे गटावर हल्ला करत म्हणाल्या…

याला आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, “नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावे. ते फरार असून, अद्याप पोलिसांना सापडले की नाही, याची माहिती नाही. त्यामुळे स्वत: केलेल्या भानगडी पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावे. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही.”

हेही वाचा : “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला”, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा एकनाथ शिंदेंनी घेतला समाचार; म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्यक्तीगत आरोप केले, तर भाजपा पेटून उठेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला दिला आहे. याबाबत विचारले असता मनीषा कायंदेंनी म्हटलं, “बावनकुळे काय बघू घेणार आहेत? महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही महाराष्ट्रात खेळ केला असून, कपटकारस्थान रचत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना कधीही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही,” असा पलटवार मनीषा कायंदेंनी केला आहे.