रायगड किल्ल्याच्या मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती करून रायगड किल्ल्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांनी शुक्रवारी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पíरकर बोलत होते. याप्रसंगी आमदार विनायक मेटे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कालगुडे, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, उपाध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पíरकर पुढे म्हणाले की, रायगड किल्ल्याला एक विशेष महत्त्व आहे. या किल्ल्याचे पुरातत्त्व मूल्य कमी न होता त्याच्या मूळ स्वरूपात बदल न करता त्याची दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करून किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
या प्रकारची दुरुस्ती करताना येथे दरबार भरला आहे, अष्टप्रधान मंडळ अशा महत्त्वाच्या घटना पाहता याव्या, अशा प्रतिमा करता याव्या अशा प्रकारची दुरुस्ती व्हायला पाहिजे. यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक महत्त्वाचे गुण होते.
त्यांच्यातील एकातरी गुणाचा अंगीकार करून वाटचाल केली पाहिजे. शिवरायांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी आपण सर्वानी कटिबद्ध राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार विनायक मेटे म्हणाले की, रायगड किल्ला येथे होणारे शिवराज्याभिषेक, पुण्यतिथी अशा प्रकारचे होणारे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात साजरे व्हायला पाहिजेत. जनतेनेही अशा कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे.
या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी, परिसरात विश्रामगृह बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळावी. तसेच परिसरात सनिक स्कूल सुरू करावे, अशी मागणी आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने विविध वयोगटात आयोजित केलेल्या गडारोहण स्पध्रेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचा, कीर्तनकार, शाहीर यांचा मनोहर पíरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रायगड किल्ल्यावरील बारा दुर्मीळ पुस्तके एकत्र करून पुस्तकाचे संपादन करणारे प्र.के.घाणेकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्यदलातील येसाजी कंक यांचे बारावे व तेरावे वंशज भगवानराव कंक, शशिकांत कंक, देशाच्या सन्यदलात उत्कृष्ट कामगिरी केलेले लेफ्टनंट जनरल व्ही.एम.पाटील यांचाही केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंडळाच्या शिवराय मुद्रा या स्मरणिकेचे प्रकाशनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रोपवेचे निर्माते कै. विष्णुपंत जोग यांना जाहीर करण्यात आलेला शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार राजेंद्र जोग व वैशाली जोग यांनी स्वीकारला.
प्रारंभी केंद्रीय मंत्री पíरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमानंतर राजदरबार ते शिवसमाधी अशी शिवप्रतिमा मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन रघुजीराजे आंग्रे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे मंडळाचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.