रायगड किल्ल्याच्या मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती करून रायगड किल्ल्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांनी शुक्रवारी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पíरकर बोलत होते. याप्रसंगी आमदार विनायक मेटे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कालगुडे, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, उपाध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पíरकर पुढे म्हणाले की, रायगड किल्ल्याला एक विशेष महत्त्व आहे. या किल्ल्याचे पुरातत्त्व मूल्य कमी न होता त्याच्या मूळ स्वरूपात बदल न करता त्याची दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करून किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
या प्रकारची दुरुस्ती करताना येथे दरबार भरला आहे, अष्टप्रधान मंडळ अशा महत्त्वाच्या घटना पाहता याव्या, अशा प्रतिमा करता याव्या अशा प्रकारची दुरुस्ती व्हायला पाहिजे. यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक महत्त्वाचे गुण होते.
त्यांच्यातील एकातरी गुणाचा अंगीकार करून वाटचाल केली पाहिजे. शिवरायांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी आपण सर्वानी कटिबद्ध राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार विनायक मेटे म्हणाले की, रायगड किल्ला येथे होणारे शिवराज्याभिषेक, पुण्यतिथी अशा प्रकारचे होणारे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात साजरे व्हायला पाहिजेत. जनतेनेही अशा कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे.
रायगडाला पूर्वीचे वैभव देणार -पíरकर
पíरकर पुढे म्हणाले की, रायगड किल्ल्याला एक विशेष महत्त्व आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2016 at 01:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar parrikar comment on raigad fort