Manoj Jarange 1 month ultimatum to CM Devendra Fadnavis Govt : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळाल्यानंतर काल (५ डिसेंबर) भाजापाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबरीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान हा शपथविधी झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. यादरम्यान त्यांनी अनेकदा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीकादेखील केली आहे. मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे मनोज जारांगे यांच्या आगामी काळातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामना पाहायला मिळू शकतो.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकार स्थापन झालं आहे, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. जी समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल, पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रासून जातील. काल ५ तारखेला त्यांचं सरकार स्थापन झालं आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. तिघांचेही मनापासून अभिनंदन”.

हेही वाचा>> Cash Recovered From Congress MP Seat : राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या जागेवर सापडले नोटांचे बंडल; सभापतींचे चौकशीचे आदेश

“पुढच्या काळात गोरगरीबांचे प्रश्न मार्गी काढावे. कारण ५ तारखेला त्यांचा शपथविधी झाला, आता येत्या ५ तारखेपर्यंत म्हणजेच ५ जानेवारीपर्यंत या एक महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, अन्यथा मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनासठी उभे राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही.

“८३ क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, २००४ चा अध्यादेशात दुरूस्ती करावी, सगेसोयरेची अंमलबजावीणी करावी, हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे सरकारचे गॅझेट, या तीनही गॅझेट संबंधीच्या मागण्या, लाखो पोरांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेणे अशा आपल्या आठ ते नऊ मागण्या याच सरकारकडे केलेल्या आहेत त्या त्यांनी मार्गी काढाव्या, अन्यथा त्यांना पुन्हा मराठ्यांना सामोरे जावे लागेल”, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

Story img Loader