मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही, असं म्हणत विरोधकांना सूचक इशाराही दिला. ते जालन्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे म्हणाले, “आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणका असा आहे. त्यामुळे जो बोलत नाही त्याला विनाकारण का लक्ष्य करायचं, मग तो कुणीही का असेना. मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे.”

“आम्ही अजित पवारांना विनंती करतो की…”

“अजित पवारांनी कमी पडलो असं म्हटलं. आता आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन हा विषय लावून धरावा. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावं. गोरगरिबाचं कल्याण करावं. दुसरी आमची काहीही मागणी नाही. आमच्या गोरगरिबांचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेल,” असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

व्हिडीओ पाहा :

“…तर तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही”

“आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. विरोध म्हणून उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका, आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर तुमच्यासमोर नतमस्तक होईन. तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा,” असंही जरांगे पाटलांनी नमूद केलं.

हेही वाचा : सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”

“मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास”

“२००४ चा जीआर किंवा नवीन जीआर लागू करा. उद्या अनेक ठिकाणी राज्यात चक्का जाम करण्यात येणार आहे. मात्र, कुणालाही वेठीस धरू नका. उग्र आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही. मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास असून ते मराठा समाजाला नक्की न्याय मिळवून देतील,” असंही जरांगे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange appeal ajit pawar over maratha reservation issue pbs
Show comments