सोलापूर : मराठा आरक्षणाशी संबधित सगेसोयरे आणि मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर ज्यांची साथ मिळेल, त्यांनाच लोकसभा निवडणुकीत निवडून देऊ. ज्यांनी मराठा द्वेष केला, त्यांना मराठा समाज पराभूत करेल. स्वतः निवडून येण्यापेक्षा पराभूत करायला मराठा समाज सरासावला आहे, यातून करेक्ट कार्यक्रम होणार आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी महायुतीचा थेट उल्लेख टाळून इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> “सोन्याच्या ताटात जेवत असताना तुम्हाला पत्रावळीवर…”, जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेवर खोचक टीका

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!

सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला भागात मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षण प्रश्नावर या नेत्यांच्या चुकांमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघातून सभा घेण्याची वेळ आहे. मोदी यांना महाराष्ट्र कळलाच नाही. यात त्यांचा दोष नाही. तर भाजपच्या राज्यातील नेत्यांचा आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाज कोणाला समर्थन दिले नाही वा कोणाला विरोधही केला नाही. परंतु मराठा आरक्षण प्रश्नी सगेसोयरे आणि मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर ज्यांची मदत मिळणार आहे, त्यांच्या बाजूने सकल मराठा समाज उभा राहणार आहे. तर  ज्यांनी विरोध करून त्रास देत मराठा समाजाचा द्वेष केला, त्यांना पराभूत करायला मराठे पुढे सरसावतील. हा करेक्ट कार्यक्रम लवकरच दिसेल, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader