मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं, मी नारायण राणेंना काही बोलत नाही, शांत आहे. बोलायला लागलो तर मी थांबणार नाही. नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्याबाबत नारायण राणे असं म्हणाले होते की त्यांनी आमच्या नेत्यांबाबत बोलू नये. आता नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange) त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“नारायण राणेंनी काय किंवा इतर कुणी काय मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही. मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. मात्र नवीन काय काढत आहेत? माहीत नाही. गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. गोरगरीबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतो आहे. गरीबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजेत.” असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange) म्हटलं आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”

सध्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काय झालंय माहीत नाही

४० वर्षे, ७० वर्षे कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीत आहे. सध्या काय झालं आहे की सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीही सुचत नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटते आहे. रात्रंदिवस हे भाकरी खातच नाहीत बहुदा ताकच पितात. मला उचकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी त्यांना उत्तर देणार नाही. मी त्यांचासारखा स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. याचे पाय चाट, त्याचे पाय चाट हे मी करणार नाही. मला मराठा समाजाला मोठं करायचं आहे असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange) म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil (
मनोज जरांगे यांच्यावर नारायण राणेंनी टीका केली होती, त्या टीकेला आता मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Manoj Jarange : “आम्ही आता आशा सोडली”, मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे माघार घेणार? म्हणाले, “त्यांचा आमदारही…”

नारायण राणे काय म्हणाले होते ?

“मनोज जरांगेंनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर ते बोलले तर आम्ही बोलणारच. आम्ही लोकसभेत काय झालं त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे.”

मनोज जरांगेंनी शनिवारी काय म्हटलं होतं?

“नांदेड, लातूर, बीड, जालना, नगर, पुणे एकही मुलगा आंदोलनातून मागे सरकला नाही. माझ्यापर्यंत आला नाही. आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी तारीख वाढवली किंवा नाही वाढवली तरी आम्ही आता आशा सोडली. आरक्षण देत नाहीत, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करत नाहीत, धनगर बांधवांना सांगितलं होतं की १० टक्के आरक्षण देऊ. त्यांनाही घेऊ देत नाहीत. ओबीसीला धोका दाखवायला लागले आहेत. त्यांचे अभियान सुरू आहेत. फडणवीसांनी दरेकरांच्या मदतीने सुरु केलेले हे अभियान आहेत”, अशी टीकाही मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी केली होती.

Story img Loader