मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात उपोषण करत आहेत. त्यांनी नऊ दिवसात अन्नाचा कणही खाल्ला नाही. त्यांना सध्या आंदोलनस्थळीच सलाईन लावण्यात आली आहे. त्यांची प्रकृती हळुहळू ढासळताना दिसत आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे.

उपोषणादरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळल्यास उपोषण मागे घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? यावर जरांगे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्याकडून कसल्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही. सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, अशी माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या पत्नीने दिली. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

हेही वाचा- “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”

मनोज जरांगेंच्या प्रकृतीवर भाष्य करताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “त्यांच्या जीवाची काळजी माझ्याइतकी कुणालाच नाही. पण महाराष्ट्रातील मराठ्यांना माझ्याइतकीच त्यांची काळजी आहे. मग मंत्र्यांनाही त्यांची काळजी असावी. मी सरकारला हात जोडून विनंती करते. तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या.”

हेही वाचा- “आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

पतीची प्रकृती ढासळल्यास तुम्ही उपोषण मागे घ्यायला लावणार का? यावर मनोज जरांगेंच्या पत्नी म्हणाल्या, “मी माझ्याकडून त्यांच्यावर कधीच दबाव टाकणार नाही. मी माझ्या डोळ्यातील अश्रू दाखवून त्यांना उपोषण मागे घ्यायला लावणार नाही. पण त्यांची काळजी सरकारने घ्यावी. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत त्यांनी उपोषण सोडू नये, असंच माझंही म्हणणं आहे. पण त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल.”