मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. केवळ मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. हे माझं एकट्याचं मत नाही. सगळेजण याच मताचे आहेत. मी काही एकटा अशा मताचा नाही. परंतु, मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मी स्वत: आधी टीका करत नाही. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. समोरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केला तर मी त्याला सोडतच नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगेंच्या टीकेला राजकारणाचा वास येतोय, या छगन भुजबळांच्या आरोपाबाबत विचारलं असता जरांगे म्हणाले की, माझ्या वक्तव्याला राजकारणाचा वास येत असेल, तर सिद्ध करा. परत ते म्हणतात टीका करतो. पण मी कधी टीका करतो? तर ते बोलल्यावर. मी राजकारणासाठी राजकारण करणारा पोरगा नाही. मी खानदानी मराठा आहे. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. पण समोरच्याने आरोप केला तर त्याला सोडतच नाही. छगन भुजबळ म्हणाले, मराठ्यांना आरक्षणात घेऊ नका, म्हणून मी टीका केली.”

हेही वाचा- “…आता तुम्ही गप्प बसा”, शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची रोखठोक भूमिका

“मी छगन भुजबळांना विनंती करतो. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. उलट तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजुने उभे राहा. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील,” असंही मनोज जरांगे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange on chhagan bhujbal maratha reservation in different quota rmm
Show comments