मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) पत्रकार परिषद बोलावली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी कारणं देऊन सरकारने आणखी वेळ मागू नये. हा तिढा सोडवण्यासाठी हवे तितके पुरावे आम्ही तुम्हाला देतो, तसेच तज्ज्ञांचं पथकही देतो, डंपर भरून पुरावे पुरवले जातील. केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येतील इतके पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. हैदराबादपासून मुंबईपर्यंतचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सगळे पुरावे सरकारला मिळतील. सरकारने केवळ याबाबत वटहुकूम काढण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटलांना विचारलं की तुमचं हे आंदोलन एका विशिष्ट पक्षाच्या ध्येयधोरणाने सुरू असून तुम्ही केवळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप काहींनी तुमच्यावर केला आहे. तुमच्या आंदोलनात राजकारण शिरलंय असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जातीवंत तरुणांनी उभा केलेला हा लढा आहे, हे कुठल्या राजकारण्याचं आंदोलन नाही.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
ubt shiv sena chief uddhav thackeray criticized rebels
आरक्षण दिले तरी लोक डबे बदलतात! पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांची टीका
Pankaja Munde Speech And Suresh Dhas Speech News
Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे आणि मलाही माहिती आहे माझा समाज काय आणि कसा आहे. त्याला (आरोप करणाऱ्याला) म्हणावं, तू तुझे उद्योग बघ. आमच्या लफड्यात पडू नको. हे खानदानी पोरांनी उभं केलेलं आंदोलन आहे. राजकारण्यांनी केलेलं नव्हे. ही सगळी जातीवंत पोरं आहेत. महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील गरिबांची लेकरं आहेत. आम्ही आमच्या भाकऱ्या आणतो, आमची चटणी खातो आणि उघड्यावर झोपतो. हे कोणा राजकारण्याचं आंदोलन नाही. उगाच आमच्या आंदोलनाला डाग लावू नका. नाव समजलं (आरोप करणाऱ्याचं) तर तुझं टमरेलच वाजवेन.

आरक्षणाच्या तिढ्यावर आणि राज्य सरकारने मागितलेल्या कालावधीबाबत मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही काल (५ सप्टेंबर) राज्य सरकारला जो चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यात आज दुसऱ्या दिवशी योगायोगाने मंत्रिमंडळ बैठकही झाली आहे. या चार दिवसांच्या काळात एक मंत्रिमंडळ बैठक झाली म्हणजे आरक्षणाविषयी निर्णय घ्यायचा असेल तर अडचण नाही.

Story img Loader