राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. ३ फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला त्यांनी विरोध केला. तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहननंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मराठा आणि ओबीसी समाजांत भेदभाव…”, भुजबळांचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “तुमचा गृहविभाग…”

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांची किव येत असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते.”

“छगन भुजबळ तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार..”, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

माझी गोरगरीब ओबोसी बांधवांना विनंती आहे. तुम्हाला मराठा समाजच साथ देणार आहे. इथून पुढे तरी तुम्ही शहाणे व्हा. भुजबळांना विनाकारण बळ देऊन तुमच्या घरात साप घेऊ नका, अशी जहाल टीका जरांगे पाटील यांनी केली.

छगन भुजबळ ज्या पक्षात जातात, तो पक्ष मोडतात, अशीही टीका जरांगे पाटील यांनी केली. ज्या पक्षाने भुजबळ यांना आता मोठे केले, तोही पक्ष त्यांनी मोडला. त्यांच्या मनात आले तर ते सरकारही मोडून काढतील. त्यामुळे आमची सरकारली विनंती आहे की, अध्यादेशाची लवकर अंमलबजावणी करावी. भुजबळांनी स्वतःचे कुटुंबही अडचणीत आणले आहे. त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जायची वेळ आली आहे. आता गरीबांचे व्यवसाय बंद करा म्हणतात, हे योग्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचं अधिकार आहे. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊ नये.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil angry reaction on chhagan bhujbal appeal to barber kvg