मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला की, मीच मुंबईत सागर बंगल्यावर (उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान) येतो. परंतु, आंदोलक आणि समर्थकांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, त्यांनी उपचारही घेतले. या सर्व आरोप-प्रत्यारोपांचे आज (२७ फेब्रुवारी) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले. अधिवेशनादरम्यान, सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे.
Premium
फडणवीसांचा विधानसभेतून हल्लाबोल अन् मनोज जरांगेंनी मागितली माफी; म्हणाले “उपोषणावेळी अनावधानाने…”
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे व त्यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कोण आहे? असा प्रश्न करत आमदार आशिष शेलार यां आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2024 at 15:55 IST
TOPICSअर्थसंकल्प २०२४ (Budget 2024)Budget 2024देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationलोकसत्ता प्रीमियमPremium Loksatta
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil apologies if abused anyone mother sister shinde fadnavis maratha reservation asc