काहीही झालं तरीही मी माझं इमान विकणार नाही. आपल्यातल्या काही हरा### अवलादी फोडल्या. आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखं काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे. मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडच्या सभेत म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्या सभेत त्यांनी फुटलेल्या लोकांवर टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आहे

प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की मला गुप्त माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आहे. मुंबईला जसा मोर्चा काढला होता त्यावेळी तेरा ट्रॅप रचले गेले होते. आता या आठवड्यातही असंच काही सुरु आहे. बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं, केसेस करायच्या, सामान्य मराठा पोरांवर केसेस करायच्या हे चाललं आहे. ऐकलं नाही तर एसआयटी नेमा आणि तुरुंगात टाका हे चाललं आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.

मी तुरुंगात सडलो तरीही चालेल..

आजच्या मी सभेत जाहीरपणे सांगतो जेलमध्ये सडलो तरीही चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही. या जगात चांगलं काम करणं अवघड झालं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं, लोकशाही मार्गाने काम करणंही जड झालं आहे. इंग्रज आणि निजाम यांच्या काळातही असं होत नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी मागच्या २० ते २२ दिवसांपासून मराठा समाज वेठीला धरला आहे. काहीही कारण नसताना त्रास देणं सुरु आहे. मात्र बाबा तुला माहीत नाही, देवेंद्र फडणवीस मला अटक करायला हिंमत लागते. सहा कोटी मराठ्यांना ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे. राज्यात आम्हाला घरं आहेत तशी तुमचीही घरं आहेत हे विसरु नका असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

माझ्याविषयी व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात

मला मिळालेली माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे, भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे. मला बदनाम करायचं म्हणजे मी मराठ्यांपासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी असंही सांगितलं आहे मनोज जरांगेंनी घाबरु नये.

देवेंद्र फडणवीसांना आव्हान

देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन. मला कितीही बदनाम करा, समाजापासून एक इंचही मागे हटणार नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. मी मेलो तरीही तुमच्या बाजूने येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती नीच आहे. आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढतोय याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्ही खरे राजकारणी. मात्र फडणवीस हे बेगडी राजकारणी आहेत. मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो आहे. तुम्ही मला बदनाम करा, कट रचा मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही. माझ्याविरोधातले व्हिडीओ व्हायरल केले तर याचा सुपडा साफ करायचा.

हे पण वाचा- मनोज जरांगेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, “फक्त आठ दिवस…”

देवेंद्र फडणवीस खुनशी

देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही. त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी SIT चौकशी सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊद्या. मी सागर बंगल्यावर जाऊन दहा लाख घेऊन जातो. मराठ्यांनी व्यसनापासून लांब रहा, आपली प्रगती कोणीही रोकू शकत नाही. जामनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा प्यायला आणि पोहे खाल्ले, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil challenge dcm devendra fadnavis in beed for loksabha election scj
Show comments