राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यानंतर प्रशासनाकडून काही ठिकाणी इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे. “अशा गोष्टी करून सरकारने राज्यातील वातावरण दुषित करू नये”, असं मत जरांगेंनी व्यक्त केलं. तसेच सरकार आमचं आंदोलन मोडू शकत नाही, असंही नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे म्हणाले, “ते आमचं आंदोलन मोडू शकत नाही. मी आणि माझा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही नेट बंद केलं तरी फरक पडणार नाही. तुमच्या नेटपेक्षा मराठा समाज हुशार आहे. महाराष्ट्रातून हजारो लोक आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी खडा पहारा दिला. काळजी करू नका.”

“अशी कामं करून राज्यातील वातावरण दुषित करू नका”

“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो की, तुम्ही नेट बंद करून किंवा अशी कामं करून राज्यातील वातावरण दुषित करू नका. तुम्ही पूर्ण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आंदोलन मोडू शकत नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळल्याच्या चर्चा, उपोषणाच्या सातव्या दिवशी फोन कॉल, मनोज जरांगे म्हणाले…

आंदोलन चिघळवण्यात सरकारची भूमिका आहे का?

आंदोलन चिघळवण्यात सरकारची भूमिका आहे का? तुम्हाला आंदोलनस्थळावरून उठवण्याचं षडयंत्र आहे का? या प्रश्नांवर मनोज जरांगे पुढे म्हणाले, “सरकार मला आंदोलनस्थळावरून उठवू शकत नाहीत. त्यांचा याच्यात १०० टक्के डाव दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचाही त्यात सहभाग आहे.”

हेही वाचा : मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”

“आमच्याकडून उद्रेक होणार नाही”

“हे आंदोलन फार मोठं झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही आंदोलनस्थळावरून उठणार नाही. आमच्याकडून उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आमचं आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेतच चालू राहणार आहे,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil comment on restriction in internet amid maratha protest pbs
Show comments