लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या लढाईचा प्रवास एकट्या मनोज जरांगे यांनी सुरू केला नाही तर दिवंगत नेते आण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली तो सुरू केला होता. त्यानंतर अन्य काहीजणांनी त्यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर दोन समाजात वाद निर्माण केला गेला नव्हता. कालपर्यंत जरांगे हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी जरांगे यांच्यावर थेट हल्ला चढविताना ते महायुती सरकारवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जाणीवपूर्वक लक्ष्य बनवत असल्याचा आरोप केला.
आणखी वाचा-गणराय निघाले तरी सोलापूर, ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित
ते म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. याच सरकारच्या काळात लाखो कुणबी पुरावे शोधून दिले. परंतु याच सरकारमधील एका प्रमुख पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जरांगे हे टीकेची राळ उठवत आहेत. विशिष्ट पक्षाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत, असा आरोप करतानाच आता मराठा समाज सावध झाला आहे. जरांगे यांच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधावे, असेही पाटील यांनी सांगितले. मराठा समाजासाठी दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण केंद्राने दिले आहे. हे आरक्षण समाजाच्या हिताचे आहे, असा दावा त्यांनी केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्यात एक लाखाहून अधिक तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. सोलापुरात लोकमंगल सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य मिळालेल्या लाभार्थी तरुणांचा मेळावा येत्या २१ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली