Maharashtra Government on Maratha Aarakshan Today : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठ्यांचा मोर्चा गुलाल उधळत आणि जल्लोष करत मुंबईच्या वेशीवरून (वाशी, नवी मुंबई) माघारी फिरणार आहे. आपण दिवसभर याबाबतच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, यावरही आपलं लक्ष असेल. आरक्षणासह राज्यभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maratha Quota Decision Manoj Jarange News Today 27 January 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

16:33 (IST) 27 Jan 2024
मराठा आरक्षणप्रश्नी मागासवर्ग आयोगाच्या हालचालींना वेग, ‘ही’ महत्त्वाची माहिती गोळा करण्यास सुरुवात

राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समांतर पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनींची माहिती मागविली आहे. मराठा समाजातील नागरिकांकडे किती जमीन आहे याबाबतची १९६० ते २०२० या कालावधीतील माहिती मागविण्यात आली आहे. त्याकरिता आयोगाने एक नमुना तयार केला आहे.

12:16 (IST) 27 Jan 2024
“मराठा समाजासाठी अध्यादेश काढलाच नाही, तो केवळ…”, छगन भुजबळांनी ठेवलं मुद्द्यावर बोट!

मुंबईत जाण्याआधीच सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला. तसंच, सुधारित अध्यादेशही जारी केल्याचं त्यांनी जाहीर केलं. सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

11:10 (IST) 27 Jan 2024
“झुंडशाहीने नियम, कायदे बदलता…”, मराठ्यांच्या विजयानंतर भुजबळ आक्रमक; म्हणाले, “आम्ही लाखोंच्या संख्येने…”

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु, मला तसं काही वाटत नाही. अशा रितीने झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. आम्हीही मंत्रिपदाची शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करू आणि निर्णय घेऊ, कोणाच्याही बाजूने निर्णय घेणार नाही, असं म्हटलं होतं. आम्ही सर्व मंत्रिमंडळाने तशी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या एक अधिसूचना काढली आहे. याचं नंतर कायद्यात रुपांतर होईल. तत्पूर्वी १६ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मी आवाहन करतो. लाखोंच्या संख्येने या हरकती पाठवाव्या. आम्ही लाखोंच्या संख्यने सरकारला अशा हरकती पाठवू. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकती पाठवाव्या. जेणेकरून सरकारला कळेल की याची दुसरी बाजूदेखील आहे. इतरांचं काहीतरी मत आहे. नुसतं एकमेकांवर ढकलून, चर्चा करून काहीही होणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागेल.

10:58 (IST) 27 Jan 2024
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार मिळतील : मुख्यमंत्री शिंदे

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ते म्हणाले, ‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो.

10:40 (IST) 27 Jan 2024
“आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या…”, मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील, असं बोललं जात होतं. परंतु, आम्ही आरक्षण घेणारच असं ठरवून घरून निघालो होतो. आम्ही २९ ऑगस्टला म्हटलं होतं, आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार…ज्यांनी पाचर मारलीय ती काढून फेकणार…मराठ्यांचा नादी लागायचं नाही. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाईलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. यापुढेही होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान-मोठे भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो.

10:32 (IST) 27 Jan 2024
“आज उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका”, जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

शिंदे साहेब, आज उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

10:16 (IST) 27 Jan 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला

मनोज जरांगे यांनी आंदोलनावेळी घोषणा केली होती की, मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजयी गुलाल उधळणार. परंतु, मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला.

10:12 (IST) 27 Jan 2024
मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांना फळांचा रस दिला. जरांगे पाटलांनी रस पिऊन उपोषण सोडलं.

09:59 (IST) 27 Jan 2024
राज्यभरातील गुन्हे मागे घेतले जाणार

आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

09:59 (IST) 27 Jan 2024
सग्यासोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळणार

ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, अशा सग्यासोयऱ्यांना जातप्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली असून याबाबत अधिकृत शासननिर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

09:58 (IST) 27 Jan 2024
जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार : मनोज जरांगे

“मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.

09:57 (IST) 27 Jan 2024
आंदोलन संपलंय की फक्त स्थगित केलं? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही आत्ता…”

मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचं रुपांतर भव्य आंदोलनात झालं. अखेर आता सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन संपलंय की तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय, याविषयी मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

09:56 (IST) 27 Jan 2024
मनोज जरांगे पाटलांच्या ‘या’ सात मागण्या अखेर मान्य; सरकारने जारी केला अध्यादेश

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं. तसंच, थोड्याचवेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते पाहुयात.

सविस्तर वृत्त वाचा

09:54 (IST) 27 Jan 2024
मनोज जरांगे मुंबईत जाणार नाही

विजयाचा गुलाल उधळण्याकरता मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार होते. परंतु, आता ते मुंबईत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडून ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाणार आहेत. तसंच, आंतरवाली सराटीपेक्षा मोठी विजयी सभा घेण्यात येणार आहे. या भाषणाची तारीख थोड्याचवेळात जाहीर करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगेंचं आंदोलन (फोटो नरेंद्र वास्कर)

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडलं होतं. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकणारं आरक्षण देण्याकरता सरकार प्रयत्न करत होतं. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसंच, येत्या काही वेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, त्यांचं हे आंदोलन रोखण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, मनोज जरांगेंनी काल २६ जानेवारी रोजी वाशीत भव्य जाहीर सभा घेतली. त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला होता. या चर्चेतही अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटलांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन येऊ, अन्यथा आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर सरकार पुन्हा कामाला लागलं. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासननिर्णय आणि लिखित पत्रे घेतली आहेत.