मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले की, “डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता. तुमचं स्वप्न एकच आहे की माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत. पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षणापायी स्वप्न भंग होतात. रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो. आमचा मराठा समाजही उस तोडायचा. रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा. स्वप्न एकच आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या वाट्याला येऊ नयेत. म्हणून आरक्षण पाहिजे. म्हणजे आपल्या दोघांचं (मराठा-धनगर) दुखणं एकच आहे.

Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ,…
Dharashiv railway station to be tripled in size with modern facilities
अद्ययावत सुविधांसह रेल्वेस्थानक होणार तिप्पट मोठे
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Ratnagiri District Planning Committee meeting approves plan worth Rs 860.21 crore
रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठकीत ८६०.२१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
Royal wedding ceremony of Shri Vitthal Rukmini on occasion of Vasant Panchami in Pandharpur
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई

हेही वाचा >> “आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू”, भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंचा निशाणा; रोख कोणावर?

“पडलेलं सरकार (विरोधक) म्हणतं की मी निवडून आलो की लगेच आरक्षण देतो, मग पडलेलं निवडून आलं की दुसरं पडलेलं म्हणतं की चारच दिवसांत देतो फक्त मोगलाई येऊदे. अरे तुमची सत्ता येते केव्हा? आम्हाला किती दिवस फिरवणार? ही जागृकता आपल्यात येणं महत्त्वाचं आहे. नुसते भाषणं ठोकून उपयोग नाही”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“घराघरात मराठा आरक्षण समजावण्यासाठी आम्ही कंबर कसली, तसं तुम्हाला धनगाराच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण अगोदर सांगावं लागेल. जर एकदा धनगाराची लाट उसळली तर या देशातील कोणतीच शक्ती आरक्षण देण्यापासून वाचवू शकणार नाही. पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार. त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही”, असा सल्लाही जरांगे पाटलांनी धनगर समाजाला दिला.

“आज आमचा शेवटचा दिवस आहे. सध्या ते विमाने घेऊन पळत आहेत. त्यांच्याकडे विमाने आहेत. नुसते बसे-उठेपर्यंत ते आपल्यापर्यंत येतात. आम्ही उपोषण सोडण्यावेळी आम्हाला कळलं की ते येत आहे. आम्ही व्यासपीठावर टेकण्याआधीच ते विमानाने टेकले. इतक्या गडबडीने आले. त्यांनी अनेक डाव टाकले, ते आम्ही सगळे उधळले”, असंही ते पुढे म्हणाले.

“तुमचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. विदर्भातील माणसाला आरक्षण का दिलं, असा प्रश्न मी विचारला होता. तेव्हा ते म्हणाले की त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग मी म्हटलं आमच्याकडे समुद्र आहे का? माळी बांधवांचा व्यवसाय काय आहे? शेती. मग आमचा काय आहे? धनगर बांधवांचा व्यवसाय शेती आहे. तुम्ही (धनगर समाज) घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं देत नाहीत? सामान्य धनगर बांधवांना डोकं लावावं लागेल. तुम्ही गप्प बसू नका. तुम्हाला तुमच्या लेकराबाळांचं चांगलं करायचं असेल तर तुम्हालाच पेटून उठावं लागेल. तुम्ही एसटी आहात, घटनेत तुम्हाला आरक्षण द्यायला मिळायला पाहिजे. तुम्ही घर न् घर जागं करा. मी शब्द देत आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत”, असा विश्वासही त्यांनी धनगर समाजात निर्माण केला आहे.

Story img Loader