Manoj Jarange On Devendra Fadnavis : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अनेकवेळा उपोषण आणि आंदोलन केलं. त्यांच्या उपोषणावर राज्य सरकारने आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं. मात्र, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत सरकारने अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं असून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच येत्या २५ जानेवारीपासून आपण पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. मनोज जरांगे पाटील हे परभणी दौऱ्यावर होते. यावेळी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली.

हेही वाचा : आगामी महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? बावनकुळेंचं मोठं विधान, म्हणाले, “तोच निर्णय…”

मनोज जरांगे काय म्हणाले?

“मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे दोन कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या २५ जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार आहे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

“आता काहीजण म्हणत आहेत की, तेच (महायुतीचं) सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. मग आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आता होऊ द्या, कारण आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. मी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, मी तर आरक्षण द्या म्हणतो, असं म्हणायचे. मग आता समजेल की ते (देवेंद्र फडणवीस) मराठा आरक्षण देतात की नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नाही. मात्र, त्यांच्या विधानाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, अशी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेल किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील, आमच्या भूमिकेत कोणतंही अंतर नाही. जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.