Manoj Jarange Patil On Amit Shah: राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसींनी विरोध केला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ‘आम्ही अनेक आंदोलने हाताळली, त्याप्रमाणे मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू’, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला. ‘मराठ्यांना बाजुला ठेवणं ही तुमची घोडचूक असेल, मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल’, असा इशारा मनोज जरांगे यांनी अमित शाह यांना दिला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“एकतर ते (अमित शाह) काय उद्देशाने बोलले मला माहिती नाही. मात्र, अमित शाह शिर्डीला आले होते, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की, मराठा आरक्षणावर बोला. पण ते काहीही बोलले नाही. पण साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं? तुम्ही गुर्जर आंदोलन कसं हाताळलं? तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार का? आम्ही देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांना सांगतो की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावंच लागणार आहे. निवडणुकीच्या आधी अध्यादेश काढावा लागणार आहे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
Deputy CM Devendra Fadnavis Advised to nitish rane to avoid controversial statements
नागपूर : वादग्रस्त वक्तव्य टाळा, फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…

हेही वाचा : Vijay Wadettiwar : “शाळांमध्ये गौतम अदाणींचा फोटो लावायची तयारी सुरू”, राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची टीका

“मी देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की, तुम्ही मराठ्यांना सोडून राज्यात सत्ता स्थापन करू शकत नाहीत. मी चांगल्या भावनेने सांगतो. जर तुम्ही मराठ्यांचं आंदोलन चांगल्या भूमिकेने हाताळलं तर तुम्हाला ते परवडेल. जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीही हटवू शकत नाही. हे मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना सांगत आहे. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत मला चांगली माहिती आहे. जर तुम्हाला वाटत असेल मराठ्यांना बाजूला ठेवून हे आंदोलन हाताळू तर अमित शाहांची ही घोडचूक असेन”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तुम्ही जर मराठ्यांना बाजूला ठेवलं आणि तुम्हाला जे काही आणायचं ते आणलं तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाहीत. आता तुम्ही मराठा आरक्षणाबाबत दुसरी पद्धत वापरू नका. तुम्ही आमचं मराठ्यांचं नाव घेतलं म्हणून सांगत आहे. गुर्जर आणि पटेल समाजाचं आंदोलन तुम्ही हाताळलं तसं मराठ्यांचंही आंदोलन हाताळू असं तुम्हाला वाटत असेल तर त्या पद्धतीने आमचं आंदोलन हाताळू नका. महाराष्ट्रात तुमची पद्धत चालत नसते. माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत तु्म्ही पडाल तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.