मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घरांना आंदोलकांना आग लावली. या प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आणि उद्रेक न करण्याचं आवाहन केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (३१ ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषणाला सुरुवात केली होती, यामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावत होती. यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Register a case against Manoj Jarange Patil, protesters demand outside Shivajinagar police station in Pune
“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी

हेही वाचा- शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

मराठा आंदोलकांनी केलेल्या उद्रेकाबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजाने काल सांगितलं होतं, आरक्षण दोन दिवस उशिरा मिळालं तरी चालेल तुम्ही पाणी प्या… त्यानंतर मी जाहीरपणाने कालपासून पाणी प्यायला लागलो आहे. मी पाणी प्यायल्यानंतर मराठा समाज शांत होणार आणि माझ्या मतानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज १०० टक्के शांत झाला आहे. एखादी हिंसक घटना घडली असेल तर मी त्यांना पुन्हा सांगतोय, उद्रेक करू नका आणि आत्महत्या करू नका.”

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणावरून आणखी एका खासदाराचा राजीनामा

“आपण जर खास क्षत्रिय मराठा असू तर आपण लढायचं असतं. आत्महत्या करून मरायचं नाही. मीही लढतच आहे, मी अशा मरणाला घाबरणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढा, कुणी आत्महत्या करू नका आणि उद्रेक करू नका,” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

हेही वाचा- “राजीनामा देणारा शिंदे गटाचा खासदार काल नारंगी सदरा घालून मस्तपैकी…”, संजय राऊतांचं विधान चर्चेत

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तुम्ही पाणी प्या, आम्ही थंड होतो, असं मराठा समाजाने सांगितलं होतं. मी आता पाणी प्यायलोय, माझ्या माहितीनुसार मराठे दिलेल्या शब्दाला पक्के जागलेत. सगळीकडे शांततेत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा साखळी उपोषण आणि दुसरा टप्पा आमरण उपोषण होता. आमरण उपोषण जसं सहन होईल, तसं सुरू ठेवा. पण साखळी उपोषण मात्र बंद ठेवायचं नाही आणि राजकीय नेत्यांना आपल्या गावात येऊ द्यायचं नाही, या दोन बाबींवर आपण ठाम आहोत. मात्र राजकीय नेत्यांच्या दारात मराठ्यांनी जायचं नाही.”

Story img Loader