मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. तसेच त्यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला.

यानंतर आता बीड येथील जाळपोळीवरून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली. बीड येथील हिंसाचार मनोज जरांगे यांनीच घडवून आणला असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या आरोपाला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ हे पागल माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात, अशी खोचक टीका मनोज जरांगेंनी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : कशी दिसतेय मी नवरोबा…

हेही वाचा- भुजबळांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका वैयक्तिक? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

बीड येथील हिंसाचाराबाबत भुजबळांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “ते काहीही बोलतात. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. ते पागल झालेल्या माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात. त्यांचेच लोक हॉटेल जाळतात आणि हे इतर लोकांचं नाव घेतात. आता त्यांच्याबद्दल काही आस्था राहिली नाही. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. कारण तो खूप उंचीचा माणूस होता पण त्यांनी स्वत:चा कचरा करून घेतला.”

Story img Loader