मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. जे सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मात्र त्यांचं आंदोलन सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा केला. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेच्या आधी त्यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली. ज्यानंतर आता गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी समज द्यावी असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यांचा हा अंगुलीनिर्देश देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे.

गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांची सभा हिंसक होईल म्हणून त्यांना अटक करावी असं पत्र छत्रपती संभाजी नगर पोलिसांना लिहिलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Sharad Pawa
संतोष देशमुखांच्या मुलांचं शिक्षण ते कुटुंबाचं संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा
Rohit Pawar On Salil Deshmukh Nagpur Ajit Pawar
Rohit Pawar : शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट; पडद्यामागे काय घडतंय? रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

हे पण वाचा- “पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार आपल्याला मिळाला त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र…”, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांना विरोध करायचा असं काही नेत्यांचं धोरण आहे. गोरगरीबांचं आरक्षण रद्द करुन त्यांच्या ताटात विष कसं कालवायचं हे त्या नेत्यांना माहित आहे. जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते आहेत. आम्ही आमच्या हक्काची मागणी करतो आहोत. आम्ही काहीही वेगळी मागणी केलेली नाही. मुळात आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी म्हणूनच आरक्षण मागतो आहोत. गुणरत्न सदावर्तेंनी खरंतर सरकारला जाब विचारला पाहिजे की शांततेत आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्या आंदोलकांवर लाठीचार्ज का केला?”

देवेंद्र फडणवीसांबाबत काय म्हणाले जरांगे पाटील?

“पोलिसांना न्याय मिळाला नाही हे गुणरत्न सदावर्तेंच्या मालकांचंही स्टेटमेंट होतं. सदावर्ते कुणाचं पिल्लू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. चेल्यांना आम्ही काही उत्तर देत नसतो. त्यांच्या मालकांनी आता हे सांगितलं आहे का? १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का? मराठाही गरजेचा आहे. त्यांची ताकद तुम्हाला दिसेल. आपण एका पक्षाचे मोठे नेते आहात. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात. त्यामुळे त्यांनीच आता सदावर्तेंना समज द्यावी.” असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Story img Loader