शिरुर: संतोष देशमुख खुन प्रकरणातील बड्या नेता कोण असा प्रश्न करुन  सरकारने  पध्दतशीरपणे छूप्या अजेंडा राबवून यातून राजकीय मित्र बाजूला काढला. तपास यंत्रणेस  मुभा मिळाली असती तर आरोपीची संख्या वाढली असती असा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शिरुर येथे केला .

मनोज जरांगे हे शिरुर येथे काही काळ थांबले असता ते बोलत होते . यावेळी श्रीराम सेनेचे सुनील जाधव , समस्त सकल मराठा समाज संघ  घोडनदी विश्वस्त अविनाश जाधव , रुपेश घाडगे , रमेश दसगुडे ,बाबूराव पाचंगे , स्वप्नील रेड्डी , माजी नगरसेवक संदिप गायकवाड , अविनाश घोगरे , शैलेश जाधव आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की मराठ्याना जाणून बूजून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करु नये त्रास दिला तर आपल्या मोर्चा त्याच्याकडे वळवू असा इशारा दिला. गुंडाच्या विरोधात बोलणे , गोरगरिब मराठाना आरक्षण मागणे जातीयवाद आहे का असा सवाल ही जरांगे यांनी उपस्थित केला .धनंजय मुंडेच्या टोळीने शेतकरी गोरगरीबांना त्रास दिला अन्याय केला तर राहिलेल्या  टोळीस  जेल मध्ये घालण्याकडे मोर्चा वळवावा लागेल असे ही जरांगे म्हणाले  .

दरम्यान आरक्षणा संदर्भातील काही मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्याची मुदत मागवून घेतली असून काही मागण्या संदर्भात येत्या अधिवेशनात निर्णयाचे आश्वासन देण्यात आले आहे . एका जातीवर निवडणुक लढता येत नाही . विधानसभा निवडणूकीत दलित मराठा मुस्लिम समीकरण जुळले असते तर निवडणूका चुरशीच्या झाल्या असत्या असे ही जरांगे म्हणाले .

Story img Loader