मराठा आरक्षणामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्याने या कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे. परंतु, त्यास ओबीसी नेते विरोध करू लागले आहेत. अशातच काही ओबीसी नेत्यांनी सल्ला दिला आहे की, कुणबी प्रमाणपत्रासह मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्यावर त्यांना आरक्षणाचा केवळ तीन ते साडेतीन टक्केच लाभ मिळणार आहे. त्याऐवजी मराठ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं (EWS) १० टक्के घ्यावं. या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, कायदा सांगतो की, मराठ्यांना मिळणारं हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार. म्हणजेच मराठ्यांना ५० टक्के (ओबीसींच्या एकूण आरक्षणापैकी) आरक्षण मिळेल. आता तुम्ही EWS चा मुद्दा काढू नका. हवं तर ते आरक्षण तुम्ही घ्या आणि आम्हाला हे (ओबीसी) आरक्षण द्या. तुम्ही ते १० टक्के आरक्षण घ्या आणि ओबीसी आरक्षण आम्हाला द्या. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? चांगलं काळं रान तुम्ही घेताय आणि ज्या वावरात औत चालत नाही ते आम्हाला देताय. त्यापेक्षा वाटण्या करा आणि तुम्ही EWS आरक्षण घ्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या.

Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा
dilip walse patil remarks on dhananjay munde resignation
वळसे पाटलांकडून मुंडेंची पाठराखण; मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याची भूमिका
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

म्हणून यंदा दिवाळी साजरी करणार नाही : मनोज जरांगे

उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. आता त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. त्यामुळे आज (१२ नोव्हेंबर) त्यांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिला. रुग्णालयातील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं आता मी दोन दिवस आंतरवाली सराटी या माझ्या गावी जाणार. ज्या-ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार. त्यानंतर महाराष्ट्राचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार. मराठ्यांची एकजूट करण्यासाठी १५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा मराठवाडा आणि मुंबई असा दौरा करणार. आंदोलकांच्या गाठीभेटी घेणं सुरू करणार. या काळात साखळी आंदोलन सुरूच राहील.

हे ही वाचा >> जालन्यात भुजबळ-मुंडेंचा मोर्चा, मनोज जरांगे म्हणाले, “ओबीसी नेत्यांच्या राजकीय हट्टापायी…”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही, तसेच दिवाळीदेखील साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी दिवाळी साजरी करू शकत नाही.

Story img Loader