Manoj Jarange Patil on Hunger Strike: गेल्या एक ते दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी आंदोलन, कधी उपोषण या मार्गाने मागण्या मांडत आहेत. त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबाही मिळत आहे. मात्र, त्यांनी केलेल्या सगळ्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असून त्याआधी आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

“सरकारला संधी म्हणून हे उपोषण”

“आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीसांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाहीये. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
ajit pawar girish mahajan
“सुधरा, सुधरा, कधीतरी सुधरा, आताही कट…”, अजित पवारांची भरसभागृहात गिरीश महाजनांवर मिश्किल टिप्पणी!
Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…
PM Narendra Modi
PM Narendra Modi : जखमी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस, नेमकं काय घडलं संसदेत?

“तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कुणाचा फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर नंतर आमच्या नावानं तक्रार करायची नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी हवी”

दरम्यान, आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार करताना सगेसोयऱ्यांची आपल्या व्याख्येनुसार अंमलबजावणी केली जावी, असं ते म्हणाले. “सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट हे तिन्ही लागू करणं आवश्यक आहे. त्याशिवाय, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे होणं गरजेचं आहे. तेही आचारसंहिता लागू होण्याच्या आत. मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतही निर्णय व्हायला हवा. हे शब्द त्यांचे आहेत, माझे नाहीत. मराठा व कुणबी एकच आहेत. दोन्ही ८३ क्रमांकालाच आहेत. त्यामुळे सरकारनं याची तातडीनं अंमलबजावणी करायला हवी”, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या विरोधात बार्शीत मराठा समाजाचे आंदोलन

“आंदोलनात फूट पाडणं हे त्यांचं कामच आहे. आजही त्यांचं षडयंत्र चालूच आहे. पण मला आजपासून त्यावर बोलायचं नाहीये. मी सरकारला पुन्हा संधी देतोय की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाहीये. आमचं ध्येय आहे मराठा आरक्षण. राज्यातला सगळा मराठा समाज कुणबी आहे. याला शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. तिन्ही गॅजेट तातडीनं लागू करा. सरसकट गुन्हे मागे घेणं, बलिदान गेलेल्या कुटुंबाला सरकारी नोकऱ्या या आमच्या मागण्या आधीच त्यांना दिल्या आहेत”, असं जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

Story img Loader