मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्यातील मराठा समुदायाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगेंच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.

मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जावू नये, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळ यांच्या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, असा विश्वासही मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा- “माणसाने थोडं भानावर येऊन बोललं पाहिजे, आम्ही आरक्षण…”; मनोज जरांगे यांचं भुजबळांना प्रत्युत्तर

यावेळी छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण आहे? असा सवाल विचारला असता मनोज जरांगेंनी हटके उत्तर दिलं आहे. “आयला हे लफडं, मला नाही कळायचं.. ब्वा.. इतक्या लांब आपलं जुळू शकतं नाही. तेच एवढे मोठे मास्टरमाइंड आहेत आणि आता त्यांच्यामागे कोण मास्टरमाइंड असेल? ते कुणाला मास्टरमाइंड म्हणून टिकू देतील, असं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

हेही वाचा- ‘उपोषण संपल्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता का?’ जरांगे पाटील म्हणाले….

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं. ओबीसीमध्ये अतिशय लहान लहान जाती आहेत. धनगर, वंजारी, कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, कुंभार असे अनेक लोक त्यात आहे. त्यामुळे ओबीसींमधून आरक्षण दिलं तर कुणाचाच फायदा होणार नाही असंही भुजबळ म्हणाले.

Story img Loader