Manoj Jarange : मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) केली आहे. आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) जाहीर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा