मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी गुरुवारी (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत उपोषण सोडलं. यानंतर त्यांनी शिंदे आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. मात्र, यावेळी बोलताना अचानक मनोज जरांगे यांनी आदल्या दिवशी रात्री घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत बोलण्यास सुरुवात केली. रावसाहेब दानवेंनी खिशातून काढून दिलेल्या त्या चिट्ठीचा प्रसंग सांगताना जरांगेंनी थेट आत्महत्येचाच इशारा दिला.

मनोज जरांगेंनी रावसाहेब दानवेंना ‘माझ्या ध्यानात नव्हतं, आत्ता ध्यानात आलं’ असं म्हटलं. तसेच त्या घटनेची माहिती देताना म्हणाले, “आम्ही असे चिट्ठीफिट्ठीचे धंदे करत नाही. मी उभ्या आयुष्याची राखरांगोळी केली. मला माझ्या रानाचा बांध कुठंही हेही माहिती नाही. मी इतकं रात्रंदिवस समाजासाठी काम करतो. योगायोगाने माझा बाप इथं आला आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही, माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो. ते खाऊन हा पठ्ठ्या समाजाचं काम करतो.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

“…तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन”

“एकाने जरी मला म्हटलं की, तुला फिरायला एक रुपया दिला आहे, तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन. हे असले चिट्ठीफिट्ठीचे कारण आम्हाला सांगायचे नाही. ते आम्हाला सहन होणार नाही. जे बेगडी लोकं असतात त्यांना हे सहन होईल, मी सहन करू शकत नाही. कारण माझं उभं खानदान कष्टात गेलं आहे,” असा इशारा जरांगेंनी आरोप करणाऱ्यांना दिला.

हेही वाचा : “तीन दिवसांपूर्वी ५० हजारहून अधिक लोक उपस्थित असलेल्या बैठकीत…”; मनोज जरांगेंनी सांगितलं उपोषण सोडण्याचं कारण

“रावसाहेब दानवेंनी रात्री एक चिट्ठी काढली, यानंतर पत्रकारांनी…”

दानवेंनी दिलेल्या चिट्ठीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “लईच अवघड खेळ आहे. रावसाहेब दानवेंनी रात्री एक चिट्ठी काढली. यानंतर पत्रकारांनी ती कशाची चिट्ठी आहे, कशाची चिट्ठी आहे असं विचारून मला बेजार करून टाकलं. हे मला रात्रीची झोपही येऊ देईना. रात्री रग ओढायला लागले. कोण नेता होता असं विचारलं जात होतं. मात्र, मी सांगून टाकतो की, मी तसले धंदेच करत नाही. मी खानदानी घरात जन्माला आलो आहे.”

“मी तशी औलाद नाही, माझं तसलं रक्त नाही”

“मी खानदानी मराठा आहे. मी कुणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. मी तशी औलाद नाही, माझं तसलं रक्त नाही. त्या चिट्ठीत स्पष्टपणे आमच्या मागण्यांवर चर्चा केलेली होती. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी मला ती चर्चा अशी आहे असं सांगत ती चिट्ठी दिली. मी माझ्या मराठा समाजासमोर पारदर्शक आहे,” असं मनोज जरांगेंनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, पण…”

“माझं वाटोळं झालं, राखरांगोळी झाली, तरी मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. तो कोण आहे त्याने लक्षात ठेवावं की, मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, पण तो जर उघडा झाला, तर राज्यात त्याचा एकही पदाधिकारी राहणार नाही. त्यांनी मराठा समाजाच्या पोरांशी घात करू नये,” असा इशारा जरांगेंनी आरोप करणाऱ्याला दिला.

हेही वाचा : १७ व्या दिवशी आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा आरक्षण…”

“आम्ही तसले धंदे करत नाही”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “आमच्या तोंडात आरक्षणाचा घास आला आहे. त्यांनी त्यांची वायफळ बडबड करू नये. आमच्या मराठ्यांच्या पाच पिढींमधील लेकरांचं वाटोळं झालं आहे. त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी माझा घात करू नये. आम्ही तसले धंदे करत नाही. जे असेल ते पारदर्शकपणे समाजाच्या समोर काम करतो. आत्ताही सांगतो की, आम्ही सरकारला दिलेल्या वेळेवर ठाम आहोत. आम्ही मोठ्या मनाने १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे. आम्हाला इतर कशाचीही गरज नाही,आम्हाला आरक्षण द्या.”