मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण आज (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत सोडलं. यानंतर जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षावर केला. मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे, असं म्हणत त्यांनी शिंदेंकडे निर्णय घेण्याची क्षमता असून ते धाडसी निर्णय घेतात, असं म्हटलं. मात्र, याने मी भारावून जाणार नाही, असंही नमूद केलं. ते गुरुवारी (१४ सप्टेंबर) जालन्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनोज जरांगे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी आपल्यासमोर सिद्ध केलं आहे की, ते मराठा समाजाला आरक्षण देणार हीच खरी पावती आहे. मीही भारावून न जाता, मराठा समाजाच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून एकनाथ शिंदेंच्या मागेच लागणार आहे आणि आरक्षण घेणारच आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द दिला तसेच वागणार आहे. तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”

“मी तीन दिवसांपूर्वी सर्व समाजाला विश्वासात घेतलं”

“एकनाथ शिंदेंनी आपल्याला सांगितलं होतं की, तुम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तसा सरकारचा प्रस्ताव होता. मी तीन दिवसांपूर्वी सर्व समाजाला विश्वासात घेतलं. त्या बैठकीला ५० हजारहून अधिक लोक होते. सर्व पत्रकार त्याला साक्षीदार आहेत. मी सर्वांना विचारलं होतं की, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा आहे, देऊ का आणि आमरण उपोषण मागे घेऊ का,” अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली.

हेही वाचा : १७ व्या दिवशी बेमुदत उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

“समाजाने एकमताने सांगितलं, त्यानंतरच मी…”

“सर्वांनी बैठकीत सांगितलं की, सरकारला वेळ द्या आणि उपोषण मागे घ्या. समाजाने एकमताने सांगितलं, त्यानंतरच मी लोकांच्या शब्दावर तीन दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला आहे. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. मी आधीच तुम्हाला सर्व गोष्टी विचारल्या होत्या. यापुढील काळातही मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.