Manoj Jarange : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. तसंच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान या प्रकरणातले काही आरोपी फरार आहेत. यावरुन मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटलो.या प्रकरणातील आरोपीला अजून अटक झालेली नाही याबाबत त्यांनी चर्चा केली. आमच्या सर्वांची इच्छा आहे, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत, असं जरांगे म्हणाले.

Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच

आत्ताच हे सगळं गृहमंत्र्यांचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही-जरांगे

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे की नाही हे याबाबत आताच काही सांगता येणार नाही, राजकरणात, समाजकारणात काम करताना कोणी कोणाचे लाडकं नसतं, शत्रू नसतो, विरोधक नसतो. ज्या ज्या वेळेस चुका होतील त्या त्या वेळेस बोलावे लागेल. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

हे पण वाचा- Walmik Karad: वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, पण युक्तिवादावेळी नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत काय म्हणाले जरांगे?

मनोज जरांगे या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. याबाबत विचारलं असता जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे लवकरच सिद्ध होईल. आता चौकशी सुरु झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. कॉल डिटेल्सवरुन सगळे समोर येईल. कोणी खंडणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी फोन करायला लावले, आरोपी कोणी फरार केले, आरोपींना सांभाळतं आहे? हे सगळं चौकशीतून समोर येईल. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. ३०२ चा गुन्हा लावला जाऊ शकतो. सरकारने हे केले नाही तर मराठे पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आता या प्रकरणात आणखी काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader