मनोज जरांगेंनी गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आहे. तसंच ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण द्या आणि ओबीसीतूनच आरक्षण द्या या मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या आहेत. सरकारला दिलेली मुदतही संपली आहे. आता देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) आणखी एक इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर टीका

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आंतरवली सराटीत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडवून आणला होता. गिरीश महाजन यांनी जालन्याताली काही भाजपचे नेते हाताशी धरले होते. देशात असा हल्ला झाला नाही एवढा हल्ला आमच्यावर झाला. एवढं घाण कृत्य फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी कुणालाही सोडलं नाही. सगळ्यांवर अन्याय केला आहे. त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय करायचं ठेवलं नाही. हा भाजपा संपवणार तेव्हाच थांबेल. त्यांना वाटेल हा फक्त धमक्याच देत आहे, त्यांना २०२४ च्या निवडणुकीला दणका कळेल. थोडं थांबा”, असा सूचक इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी दिला आहे.

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Nana Patole Allegation on Jaydeep Apte
Chhatrapati Shivaji Statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात शिल्पकार जयदीप आपटेने कापूस आणि कापड..”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Tanaji Sawant vs NCP
NCP vs Tanaji Sawant: ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा

हे पण वाचा- Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भाजपाला इशारा; म्हणाले, “२०२४ मध्ये सगळ्यात मोठा…”

छगन भुजबळांवर टीका

ओबीसी नेते एकत्र आले, समाज एकत्र आला नाही. छगन भुजबळ यांनी ही काडी लावली. त्यांना फक्त भांडणं लावता येतात. धनगरांसाठी भुजबळांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मागावे, ते प्रचंड जातीयवादी आहेत. त्यांना फडणवीस सांभाळत आहेत. आम्ही ओबीसींच्या विरोधात नाही, तेही आमच्या विरोधात नाही, असंही ते म्हणाले. जे ड्रोन फिरत आहेत. ते ड्रोन देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. या ड्रोनमळे लोक भयभीत झाले आहेत. तुमच्या ड्रोनमध्ये गोळी असली तरी मी मरत नसतो. मराठे जर चवताळले तर तुमच्या १०० पिढ्यांनी बघितलं नसेल असं आंदोलन होईल, अशा शब्दात मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) टीका केली.

देवेंद्र फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीसांना इशारा देत मनोज जरांगे म्हणाले, मी सगळं काही साफ करून टाकेन. तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यही होऊ देणार नाही. माझ्या नादाला लागू नका. तुम्ही आमचे दुश्मन नाहीत. मला तुरुंगात टाकणार आहे. टाका तुरुंगात. इथे बसायचं काय अन् तिथे बसायचं काय? मला तुरुंगात टाकल्यावर भाजपची एकही सीट येणार नाही. नागपूरची सीटही पडेल; असा इशाराच मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) देवेंद्र फडणवीसांना दिला.